इंदिरा गांधी आणि वसंतदादा पाटील जन्मशताब्दी कार्यक्रमात  9 नेत्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे !

इंदिरा गांधी आणि वसंतदादा पाटील जन्मशताब्दी कार्यक्रमात  9 नेत्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे !

सोलापूर – माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाचं आज सोलापूरमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासह अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी हजेरी लावली.  या नेत्यांच्या भाषणातीत ठळक मुद्दे

 

प्रतिभाताई पाटील –

इंदिराजींनी स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले वानरसेना स्थापन करून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. 

वसंतदादांनी स्वातंत्र्यचळवळीत तुरुंगवास भोगला गोळ्या झेलल्या या महान व्यक्तींमुळे स्वातंत्र्य मिळाले ते स्वातंत्र्यांचा उपभोग आपण घेत आहोत. त्या़च्यामुळे लोकशाहीची बिजे या देशत रूजली आणि बळकट झाली. 

२० सूत्री कार्यक्रम देऊन गरिबी हटवण्याचे काम केले. 

देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी देशाला अणुशक्ती बनवून सुरक्षेच्या दृष्टीने स्वयंपूर्ण केले. 

इंदिराजींनी जगाचा भूगोल बदलला जगाचा भूगोल बदलणा-या इंदिराजी जगातल्या एकमेव महिला पंतप्रधान आहेत. 

वसंतदादामुळे खासगी इंजिनयरींग मेडीकल कॉलेज उभारली व खेड्यातली मुले मुली डॉक्टर  इंजीनीयर होऊ शकली. 

 

देशाच्या आणि राज्याचा विकासात या नेत्यांचे मोठे योगदान दिले. 

 

 

शिवराज पाटील चाकूरकर – 

 

ग्रामीण भागातील लोकांच्या विकासासाठी जेजे करता येईल ते सर्व वसंतदादांनी केले. 

इंदिराजींनी हरित क्रांतीच्या माध्यमातून देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवले. 

इंदिराजींच्या धोरणांमुळे भारताने विज्ञान क्षेत्रात एवढी मोठी प्रगती केली. 

इंदिराजींच्या धारिष्ट्याबद्दल नमन केले पाहिजे.

 

 

मोहन प्रकाश –

 

लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेल्या जय जवान जय किसान हा नारा प्रत्यक्षात अंमलात आणण्याचे काम केले. 

 दादांनी राबविलेल्या धोरणांमुळे आज महाराष्ट्र क्रमांक १ चे विकसीत राष्ट्र बनवले. 

  

अशोक चव्हाण – 

 

इंदिराजी गांधी आणि वसंतदादाच्या नेतृत्वाकडून प्रेरणा घेऊन उज्ज्वल भविष्याची निर्मिती होईल. 

 अतिशय खडतर परिस्थितीत इ़दिराजींनी देशाचे नेतृत्व केले आणि देशाला प्रगतीपथावर नेले. 

 महाराष्ट्र बांधण्याचे काम वसंतदादा पाटलांनी केले

 आज देशात आणीबाणी सारखी परिस्थिती मिळते. 

 गोरगरिब समाजासाठी इंदिराजी़नी बँकांचे राष्ट्रीयीकरण करून गरिबांसाठी बँकांचे दरवाजे उघडले पण भाजप सरकारच्या काळात बँका गरिबांना कर्ज देत नाहीत पण उद्योगपतींची हजारो कोटींची कर्जमाफी देत आहेत. 

 दादांच्या सहकार क्षेत्रातील योगदानामुळे राज्याची प्रगती झाली. शेतकरी आर्थिक दृष्ट्या संपन्न झाला दादा सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री होते. 

 इंदिराजींनी पराभवानंतर काँग्रेसला विजयी केले तीच प्रेरणा घेऊन आम्ही लढ देऊ आणि पुन्हा काँग्रेसला विजयी करू

 

 

पृथ्वीराज चव्हाण –

 

इंदिराजींचे नेतृत्व अष्टपैलू होते 

 अमेरिकेसारख्या शक्तींच्या धमक्यांना भीक न घालता इंदिराजींनी भरताला अण्वस्त्र शक्ती बनवले 

 इंदिराजींचे संपूर्ण जीवन संघर्षपूर्ण राहिले 

 मोठ्या धैर्याने त्यांनी संकटाचा सामना केला. 

 देशाला एकसंघ ठेवण्यासाठी इंदिराजींनी सर्वोच्च बलिदान दिले 

 

ग्रामीण महाराष्ट्राचा विकास आणि ग्रामीण भगातील मुलांना व्यवसाय शिक्षण उपलब्ध करून देण्याचे काम वसंतदादांनी केले 

 

 

 

डॉ. डी वाय पाटील –

 

वसंतदादा पाटील यांच्यामुळे मी शिक्षणक्षेत्रात एवढं काम करू शकलो. 

 इंदिरा गांधी माझ्यासाठी देवी होत्या 

  

माणिकराव ठाकरे – 

 

इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण करून गरिबांसाठी बँकांचे दरवाजे उघडे केले. 

 पाणी अडवा पाणी जिरवा योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाची मोठी कामे केली 

 

 शिवाजीराव पाटील निलंगेकर – 

 मी आमदार नसतानाही वसंतदादा पाटील यांनी मला मुख्यमंत्री बनवले. 

 

राधाकृष्ण विखे पाटील –

 

कार्यकर्त्वाला उजाळा देण्यासाठी हा महत्त्वाचा उपक्रम 

 देशला आणि राज्याला प्रगतीकडे नेणारे द्र्ष्टे नेेते

 भरताच्या राज्यघटनेत समाजवादी धर्मनिरपेक्ष  हे शब्द इंदिराजींच्या प्रयत्नामुळे समाविष्ट करण्यात आले 

 सामान्य भरतीयांशी नाळ जुळलेले नेतृत्व इंतिराजींचे होते 

 बांग्लादेशची निर्मिती करून इंतिराजींनी जगाचा भौगोलिक नकाशा बदलला

 देशासाठ त्यांनी त्याग केला सद्भावनेसाठी बलिदान दिले. 

COMMENTS