इक्बाल कासकरच्या खंडणी रॅकेटमध्ये राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक ?

इक्बाल कासकरच्या खंडणी रॅकेटमध्ये राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक ?

मुंबई – दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला खंडणीप्रकरणी सोमवारी रात्री ठाणे पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. त्यानंतर या खंडणी रॅकेटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन स्थानिक नगरसेवकांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.    

या नगरसेवकांची या प्रकरणात नेमकी काय भूमिका आहे, तसेच त्यांची नावे काय आहेत, याबाबतची माहिती अद्याप पोलिसांनी दिलेली नाही. आरोपींनी चौकशीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची नावे घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्याचबरोबर ठाणे पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनीही खंडणी टोळीत राजकारण्यांची नावे असल्याची माहिती दिली होती.

दरम्यान, खंडणीप्रकरणी ठाणे पोलिसांच्या अँटी एक्सटॉर्शन सेलने सोमवारी रात्री इक्बाल कासकरसह तिघांना अटक केली होती. पोलिसांनी नागपाड्यातील हसीना पारकरच्या घरातून कासकरला ताब्यात घेतले होते. ठाणे न्यायालयाने इक्बाल कासकरला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

COMMENTS