‘वंदे मातरम्’ सुरु असताना एमआयएमच्या नगरसेवक गेले सभागृह सोडून !

‘वंदे मातरम्’ सुरु असताना एमआयएमच्या नगरसेवक गेले सभागृह सोडून !

औरंगाबाद – महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वंदे मातरम् सुरु असताना एमआयएम् गटनेता नासेर सिदीकी, नगरसेविका समीना शेख, नगरसेवक जफर शेख यांनी सभागृह सोडून गेले. त्यांनतर वंदे मातरम् संपल्यावर ते सर्व सभागृहात परत आले. ‘आमचा धर्म मान्यता देत नाही या पुढे आम्ही वंदे मातरम् सुरु असताना बाहेर जाणार.’ असे  यांनी सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ‘वंदे मातरम्’ म्हणण्यावरुन वाद झाला होता.   सभागृहात एमआयएमच्या नगसेकांनी ‘वंदे मातरम्’ म्हणण्यास विरोध केल्यानं यावेळी शिवसेना-भाजपाचे नगरसेवक आक्रमक झाले.  एमआयएमचे नगरसेवक व शिवसेना-भाजपाच्या नगरसेवकांमध्ये राडा देखील झाला.

COMMENTS