मुख्य निवडणुक आयोगाने ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवण्याचं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसने स्वीकारले आहे मात्र ईव्हीएम मशीन हॅक करण्यास फक्त चास तास देण्यात आले आहेत. ही वेळ पुरेशी नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्षा व राज्यसभा खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी खासदार अॅड. वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘दिल्ली येथे होणाऱ्या ईव्हीएम मशीन हॅक करण्याच्या आव्हानाला मी, सायबर वकील आणि आयटी तज्ञ यासिन शेख असे उपस्थित राहणार आहोत. निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन हॅक करण्यासाठी चार तासांचा वेळ दिला आहे. एवढ्या कमी वेळेत मशीन हॅक करणे अशक्य आहे. तरीही आम्ही ती हॅक करण्याचा प्रयत्न करणार आहोत. वेळ जरी कमी देण्यात आला असला तरी ईव्हीएम मशीन हाताळण्यास मिळत आहे. याचे समाधान आहे’
COMMENTS