हेलिकॉप्टर अपघातातून मुख्यमंत्र्यांना कोणी आणि कसं काढलं बाहेर

हेलिकॉप्टर अपघातातून मुख्यमंत्र्यांना कोणी आणि कसं काढलं बाहेर

लातूर – लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला जेव्हा अपघात झाला त्यावेळी त्यांना कसं बाहेर काढण्यात आलं याचा एक  एक्सक्लुझिव्ह व्हिडीओ समोर आला आहे.

स्वतःचा जीव धोक्यात घालून मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी एक तरुण पुढं धावल्याचं समोर आलंय. इरफान शेख असं या तरुणाचं नाव आहे. ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं त्यावेळी सगळेच विरुद्ध दिशेला पळत सुटले. पण इरफाननं हेलिकॉप्टर जिथं पडलं तिथं धाव घेतली. हेलिकॉप्टरचा दरवाजा जोरात ओढला. मुख्यमंत्र्यांनी बाहेर येत आपण ठीक असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यानं इतरांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. इरफानच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

पाहा व्हिडीओ :

COMMENTS