ईव्हीएम सोबत छेडछाड शक्य, अमेरिकेच्या शास्त्रज्ञाच्या हवाल्याने बीबीसीचे वृत्त !

ईव्हीएम सोबत छेडछाड शक्य, अमेरिकेच्या शास्त्रज्ञाच्या हवाल्याने बीबीसीचे वृत्त !

गेल्या काही दिवसांपासून ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा आरोप अनेक पक्षांकडून केला जात आहे. निवडणूक आयोग मात्र हे आरोप मान्य करायला तयार नसून त्यांनी तज्ज्ञांना आव्हान दिलं आहे की ईव्हीएमसोबत छेडछाड करून दाखवाचं. त्यातच याला आव्हान देत अमेरिकेतल्या एका शास्त्रज्ञाने छातीठोकपणे दावा केला आहे कि, ईव्हीएम सोबत छेडछाड  शक्य आहे. अमेरिकेच्या शास्त्रज्ञाच्या हवाल्याने बीबीसीने हे वृत्त दिले आहे.

अमेरिकेमधील मिशिगन विद्यापीठातील जे अलेक्स हल्डरमन नावाच्या शास्त्रज्ञाने दावा केला आहे की मी एक असे उपकरण बनवले आहे ज्याद्वारे ईव्हीएमसोबत छेडछाड करणे शक्य आहे. या शास्त्रज्ञाने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी भारतातील एका ईव्हीएम मशिनला हे उपकरण जोडून निकाल कसे बदलता येतात हे दाखवल्याचा दावा केला आहे. ईव्हीएमला हे उपकरण जोडल्यानंतर ते मोबाईलवरून नियंत्रित करता येऊ शकतं. मोबाईलच्या मदतीने निवडणुक निकालात बदल करता येते, असे हल्डरमन यांनी म्हटले आहे.

निवडणुक निकालात बदल करण्यासाठी ईव्हीएम मशिनमध्ये एक मायक्रोप्रोसेसर लावणे गरजेचे असते, तो लावला की निकालात हवा तसा बदल करता येतात असे बीबीसीशी बोलताना या शास्त्रज्ञाने सांगितले आहे. यासंबधी निवडणूक आयोगाचे आलोक शुक्ला यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, हे शक्य नाही आहे. कारण शास्त्रज्ञांनी जो दावा केला आहे, त्यानुसार त्यांना ईव्हीएम मशिनमध्ये मायक्रोप्रोसेसर किंवा चिप बसवणे गरजेचे असते. निवडणुकीसाठी जेव्हा ईव्हीएम मशिन आणली जातात तेव्हा ती कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत ठेवली जातात. त्यावर सीलदेखील लावण्यात येते. त्यामुळे या ईव्हीएम मशिनसोबत छेडछाड केवळ अशक्य आहे असे शुक्ला यांनी म्हटले आहे.

दरम्यान,  2009 च्या निवडणुकीत 1,368,430 ईव्हीएम मशिनचा वापर करण्यात आला होता. या सगळ्या ईव्हीएम मशिनमध्ये अशा पद्धतीने चिप लावणे कितपत शक्य आहे असा प्रश्न देखील या शास्त्रज्ञांच्या दाव्यावर उपस्थित करण्यात आला आहे.

 

BBC News | US scientists ‘hack’ India electronic voting machines –

http://www.bbc.com/news/10123478?ocid=wsnews.chat-apps.in-app-msg.whatsapp.trial.link1_.auin

 

 

 

 

 

 

 

 

COMMENTS