उत्तराखंडमध्ये ईव्हीएम मशिन्स जप्त करण्याचे न्यायालयाकडून आदेश

उत्तराखंडमध्ये ईव्हीएम मशिन्स जप्त करण्याचे न्यायालयाकडून आदेश

उत्तराखंडमधील विकासनगर विधानसभा निवडणुकी वेळी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन जप्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. काँग्रेसचे उमेदवार नव प्रभात यांनी भाजपच्या मुन्ना सिंह चौहान यांच्या निवडीवर आक्षेप घेतल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. निवडणुकीवेळी ईव्हीएममध्ये घोळ करण्यात आल्याचा आरोप नव प्रभात यांनी केला होता.

विकासनगर मतदारसंघातील ईव्हीएम पुन्हा दुसऱ्या कुठल्या निवडणुकांसाठी वापरू नका, असे सांगण्यात आले आहे. उत्तराखंड निवडणूक झाल्यानंतर हे ईव्हीएम वापरण्यात आले नव्हते. निवडणूक झाल्यानंतर किमान दोन महिने ईव्हीएम वापरता येत नाहीत, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. उत्तराखंड निवडणुकीमध्ये 11,000 ईव्हीएम वापरले गेले होते. त्या पैकी 139 ईव्हीएम विकासनगर मतदारसंघासाठी वापरण्यात आले होते.

COMMENTS