लखनऊ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी यादव कुटुंबात उफाळून आलेले वाद आता पराकोटीला गेल्याचं चित्र आहे. यावरुन मुलायमसिंग यादव यांच्या कुटुंबात फूट पडल्याचं चित्र निर्माण झालंय. मुलायमसिंग यादव यांच्या दुस-या पत्नीचा मुलगा प्रतिक यादव आणि त्यांची पत्नी अपर्णा यादव यांनी काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. अपर्णा यादव यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत लखनऊमधून निवडणूक लढवली होती. मात्र काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा आणि भाजप उमेदवार रिटा बहुगुणा जोशी यांच्याकडून त्या पराभूत झाल्या होत्या. विधानसभा निवडणुकीपुर्वी यादव कुटुंबातले वाद चव्हाट्यावर आले होते. अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांच्यातल्या वादाने पक्षाच्या इमेजला मोठा धक्का बसला होता. पराभवामध्ये कुटुंबातील वाद हे एक कारण सांगितलं जातंय. आता अपर्णा यादव यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे हा वाद कुठे वळण घेणार याकडं उत्तर प्रदेशातील जनतेचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS