उदयनराजेंच्या अटकेच्या निषेधार्थ साताऱ्यात जाळपोळ, एसटी सेवा बंद !

उदयनराजेंच्या अटकेच्या निषेधार्थ साताऱ्यात जाळपोळ, एसटी सेवा बंद !

खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा जिल्‍हा न्यायालयाने खंडणीच्या गुन्‍ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. उदयनराजे आज स्‍वत:हून सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर पोलीसांनी उदयनराजे यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. 

उदयनराजे यांना अटक केल्यानंतर उदयनराजे यांचे समर्थक आक्रमक झाले आहे. समर्थकांनी शहरात जाळपोळ करत सातारा शहरालगत असलेल्या सातारा – फलटण वर रास्ता रोको करण्यात आला.  समर्थकांनी घोषणाबाजी करत सातारा बंदचे आवाहन केले आहे. सातारा शहरासह जिल्ह्यात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. साता-यात सर्व एसटी सेवा बंद असून, प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

COMMENTS