रामनाथ कोविंद देशाचे नवीन राष्ट्रपती, संसद भवनात शपथविधी संपन्न

रामनाथ कोविंद देशाचे नवीन राष्ट्रपती, संसद भवनात शपथविधी संपन्न

रामनाथ कोविंद हे आज भारताचे 14 वे राष्ट्रपती बनले. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रपती पद व गोपनीयतेची शपथ घेतली. या शपथ ग्रहण समारंभासाठी अनेक मान्यवर नेते, पदाधिकारी व सरकारी अधिकारी उपस्थित होते. कोविंद यांना सरन्यायाधीश जे एस खेहर यांच्या हस्ते शपथ देण्यात आली.

“भारताचे राष्ट्रपतीपद मी अत्यंत नम्रतेने स्वीकारत आहे. ही जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आल्याबद्दल मी सर्वांचा अत्यंत ऋणी आहे. मी अत्यंत साध्या पार्श्‍वभूमीमधून येथपर्यंत आलो आहे; आणि माझा हा प्रवास दीर्घ झाला आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ ए पी जे अब्दुल कलाम आणि प्रणवदांसारख्या व्यक्तिमत्त्वांनी जे पद भूषविले; त्याच मार्गावर चालण्याची संधी मिळणे, हा माझा बहुमान आहे,’ अशी भावना कोविंद यांनी यावेळी व्यक्त केली.

 

COMMENTS