नांदेड – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नांदेड जिल्ह्याच्या दौ-यावर आले होते. उद्धव यांचे स्टेजवर आगमन होत असताना त्यांच्या समोरच पक्षाच्या दोन नेत्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उद्धव ठाकरे स्टेजवर येत होते तेंव्हा नांदेडचे आमदार हेमंत पाटील हे माईकवरुन उद्धव ठाकरे यांचं स्वागत करत घोषणा देत होते. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी हेमंत पाटील यांना माईक दुस-या नेत्याकडे द्यायला सांगितले. मात्र हेमंत पाटील हे ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे राऊत आणि पाटील यांच्यात चांगलाच वाद रंगला. यामुळे शिवसेनेतील गटबाजी उद्धव ठाकरे यांच्यासमोरच चव्हाट्यावर आली. उद्धव ठाकरे यांचा पक्षात दरारा नाही, शिवसेनाप्रमुख असते तर असा प्रकार झाला असता का ? अशी चर्चा कार्यर्त्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू होती.
COMMENTS