नाशिक – महापौरांचा विरोध डावलून दिंडोरी, त्र्यंबक रोडवर दारु विक्री सुरू ?

नाशिक – महापौरांचा विरोध डावलून दिंडोरी, त्र्यंबक रोडवर दारु विक्री सुरू ?

नाशिक –सुप्रीम कोर्टाच्या आदेशातून काल महापालिकेने पळवाट शोधली. दिंडोरी रोड आणि त्र्यम्बकरोड वरील रस्त्यांची मालकी सार्वजनिक बांधकाम विभागाकड़ून महापालिकेकडे वर्ग झाली. आणि या मार्गावर मद्यविक्रीचा मार्ग सुकर झाला. त्यामुळे या दोन मार्गावरिल जवळपास 42 दुकाने 3 महिन्यानंतर पुन्हा सुरु झाली आहेत. मात्र या निर्णयासाठी महापौर राजी होत्या की नव्हत्या हे मात्र समजायला तयार नाही. कारण आज दिंडोरी रोड वरील म्हसरूळ पोलीस स्टेशन जवळ असलेल्या अमित वाईन्स या दुकानाविरोधात स्थानिकांनी स्थानिक नगरसेविका असलेल्या महापौरांकडे तक्रार केली. महापौरांनीही लगेच प्रभागातील इतर नगरसेवकांना घेऊन स्थानिकांसह थेट म्हरुळ पोलीस स्टेशन गाठलं आणि ते वाईनशॉप स्थलांतरीत करण्याची मागणी केली. काल मद्यविक्रीचा मार्ग मोकळा झाला असताना महापौरांनी आज एका वाईन शॉपविरोधात पोलिसांत तक्रार केल्यामुळे शहरात हा चर्चेचा विषय ठऱला आहे. महापौरांचा या एकाच वाईन शॉपला विरोध आहे की दोन्ही मार्गावरील मद्दविक्रीलाच विरोध आहे हे समजू शकलं नाही. राजकीय दबावापोटी महापौरांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रोड महापालिकेकडे वर्ग करुन घ्यावे लागले की काय अशी चर्चा शहरात सुरू आहे. महापौरांनी मात्र यावर बोलण्यास नकार दिलाय.

COMMENTS