उपराष्ट्रपतिपदासाठी व्यंकय्‍या नायडूंचा उमेदवारी अर्ज दाखल

उपराष्ट्रपतिपदासाठी व्यंकय्‍या नायडूंचा उमेदवारी अर्ज दाखल

एनडीएतर्फे व्यंकय्‍या नायडू यांनी उपराष्‍ट्रपतिपदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नायडू यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, भाजपचे ज्येष्‍ठ नेते लालकृष्‍ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री सुषमा स्‍वराज, सुरेश प्रभू, रामदास आठवले आदी नेते उपस्‍थित होते. रालोआच्या सहकारी पक्षांचे नेते तसेच शिवसेनेचे खा. आनंदराव अडसूळ यावेळी उपस्‍थित होते. 

एनडीएकडून उपराष्‍ट्रपतिपदासाठी व्यंकय्‍या नायडू यांच्या नावाची घोषणा अमित शहांनी सोमवरी रात्री केली होती. संयुक्‍त पुरोगामी आघाडीकडून उपराष्‍ट्रपतिपदासाठी गोपालकृष्‍ण गांधी हे उमेदवार आहेत. त्यामुळे आता व्यंकय्‍या नायडू व गोपालकृष्‍ण गांधी यांच्यात उपराष्‍ट्रपतिपदासाठी लढत होणार आहे. उपराष्ट्रपतिपदासाठी 5 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. तसेच मतदानानंतर लगेचच मतमोजणी होणार आहे.

COMMENTS