उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 5 ऑगस्टला

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 5 ऑगस्टला

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक  5 ऑगस्टला होणार आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत निवडणूकीच्या तारखेची घोषणा केली.  उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी  18 जुलैपर्यंत मुदत आहे, 5 ऑगस्टला होणार निवडणूक होणार असून, त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यांनी दोन वेळा उपराष्ट्रपतीपद भूषविले आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी ‘एनडीए’कडून केंद्रिय मंत्री वेंकय्या नायडू आणि राज्यपाल नजमा हेपतुल्लाह यांची नावे चर्चेत आहेत. मात्र नायडू यांनी आपण उपराष्ट्रपतीपदासाठी इच्छुक नसल्याचे सांगितले.

राज्यसभा व लोकसभेतील निवडून आलेल्या व नामांकित सदस्य उपराष्ट्रपतींची निवड करतात. दोन्ही भवनातील सदस्यांची संख्या 790 आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिदध सभापती असतात.

 

 

 

COMMENTS