उस्मानाबाद – येडशीत राष्ट्रवादी विरोधात सर्वपक्षीय पॅनल ? राष्ट्रवादीचे नलावडे भाजपच्या वाटेवर !

उस्मानाबाद – येडशीत राष्ट्रवादी विरोधात सर्वपक्षीय पॅनल ? राष्ट्रवादीचे नलावडे भाजपच्या वाटेवर !

उस्मानाबाद – तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या येडशी ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे खंदे समर्थक तथा येडशीचे माजी सरपंच गजानन नलवडे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. गावातील राष्ट्रवादीचे नेते तथा माजी पंचायत समिती सभापती लोखंडे याच्यातील अंतर्गत धुसफुसीतून नलवडे यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू झाल्याने सत्ताधारी राष्ट्रवादीला हादरा देण्यासाठी येडशीत सर्वपक्षीय पॅनल करण्यासाठी गावपुढारी कामाला लागले आहेत.

COMMENTS