ऋषी कपूर राहुल गांधींवर का भडकले ?

ऋषी कपूर राहुल गांधींवर का भडकले ?

बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर भडकले आहेत.अमेरिकेतील बर्कले युनिव्हर्सिटीमध्ये राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणावर ऋषी कपूर यांनी संताप व्यक्त केलाय. राहुल गांधी यांनी घराणेशाहीबद्दल बोलताना राजकारणापासून ते बॉलिवूडपर्यंत सगळीकडे घराणेशाही असून आपला देश त्याच्यावरच चालतो असे म्हटले होते. यावरुन ऋषी कपूर यांनी ट्विट करुन राहुल गांधींना चांगलचे झापले आहे.

ऋषी कपूर यांनी तीन ट्विट करत राहुल गांधी यांना झापले आहे. ऋषी कपूर ट्विटमध्ये लिहिले आहे की,  ‘राहुल गांधी, भारतीय सिनेमाच्या 106 वर्षांच्या योगदानातल्या 90 वर्षांचे योगदान कपूरांचे आहे. आणि कपूरांच्या सर्व पिढ्यांना जनतेने निवडलं आहे. देवाच्या दयेने आज आमची चौथी पिढी सिनेमात आहे. पृथ्वीराज कपूर, राज कपूर, रणधीर कपूर, रणबीर कपूर. तुम्ही वंशवादावर लोकांना मूर्ख बनवू नका. लोकांचा आदर आणि प्रेम मेहनतीने मिळवता येतं, जबरदस्ती आणि गुंडगिरीने नाही.’ अशा शब्दात ऋषी कपूर यांनी ट्विट करुन राहुल गांधींना चांगलंच सुनावलं आहे.

COMMENTS