अॅमेझॉन या ई – कॉमर्स संकेतस्थळावर विक्रीसाठी असलेल्या भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर विक्रीसाठी असलेल्या भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीरचा भाग वगळल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे अॅमेझॉन पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे.
अॅमेझॉनकडून कॅनडामध्ये जम्मू-काश्मिरमधील वादग्रस्त भागाचा समावेश नसलेला नकाशा विक्रीसाठी उपलब्ध असल्याची बाब समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते ताजिंदर पाल एस. बग्गा यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. भारत सरकारच्या अधिकृत नकाशापेक्षा वेगळा असा व्हिनाईलचा भिंतीवर लावता येणारा नकाशा विक्री करण्यात येत आहे. बग्गा यांनी ट्विटरद्वारे ही बाब उघड केली असून त्यामध्ये अशा चुकीच्या नकाशाची विक्री तातडीने थांबविण्यात यावी असे म्हटले आहे.
‘अॅमेझॉन डॉट सीएकडून भारताच्या विद्रुप केलेल्या नकाशाची विक्री करण्यात येत आहे. हे अस्वीकारार्ह्य आहे. तुमच्या संकेस्थळावरून हे हटवावे आणि अशा नकाशाची विक्री तातडीने थांबविण्यात यावी’, असे ट्विट बग्गा यांनी केले आहे.
COMMENTS