एकनाथ खडसेंवर अन्याय झाला, विरोधक आले मदतीला !

एकनाथ खडसेंवर अन्याय झाला, विरोधक आले मदतीला !

मुंबई – भोसरीमधील वादग्रस्त जमीन केवळ साडेतीन एकर होती. ही जमीन एमआयडीसी विसरली होती. ही जमीन संपादित करण्यासाठी 46 वर्षांपूर्वी नोटिफिकेशन काढले होते. पण जमिनीचे संपादनच झाले नव्हते. अशी जमीन एकनाथ खडसे यांच्या जावयाने मालकाकडून विकत घेतली. मात्र मुख्यमंत्र्यांनी कोणतीही चौकशी न करता खडसे यांचा राजीनामा घेतला.

मात्र उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसीची 30 हजार एकर जमीन वगळली तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही. असा भेदभाव का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. वारंवार सरकारला अडचणीत आणणा-या एकनाथ खडसे यांची बाजू घेऊन मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्याचं काम जयंत पाटील यांनी केलं आहे.

COMMENTS