“अंदर की बात है, एमआयएम भाजप के साथ है“

“अंदर की बात है, एमआयएम भाजप के साथ है“

मुंबई – मराठा आरक्षणाबाबत आज विधानसभेत चर्चा सुरू होती.  विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि मराठा समाजाचे प्रतिनिधी यांच्यात काय चर्चा झाली याबाबतचं सविस्तर निवेदन करण्याची मागणी केली. मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी दिलेले आश्वासन आणि आज विनोद तावडे यांनी केलेले निवेदन यामध्ये तफावत असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला.

त्यावेळी मध्येच एमआयएमचे आमदार इमतियाज जलील उभे राहिले आणि मुस्लिम आरक्षणाबाबत बोलू लागले. मुस्लिम आरक्षणबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आम्हाला फसविले आहे. गेल्या 15 वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते झोपले होते काय ? असा सवालही जलील यांनी केला. यावर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आमच्या सरकारने मुस्लिमांनी 5 टक्के आरक्षण दिले होते असं सागण्याचा प्रय़त्न केला. तरीही जलील यांनी त्यांच्यावर तोफ डागणं सुरू होतं. त्यामुळे विरोधकांनी मग घोषणाबाजी सुरू केली. अंदर की बात है एमआयएम भाजप के साथ है. मुख्यमंत्री आणि सत्ताधारी सदस्य हे विरोधकांमधील वाद एन्जॉय करत होते.

COMMENTS