एनडीएचे कोविंद यांना 63 टक्के मतदारांचा पाठिंबा, वाचा मतांचे गणित कसे आहे ?

एनडीएचे कोविंद यांना 63 टक्के मतदारांचा पाठिंबा, वाचा मतांचे गणित कसे आहे ?

राष्ट्रपतीपदासाठी आता एनडीएचे रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या मीराकुमार यांच्यात मुख्य लढत होत आहे.  मात्र कोविंद यांना जवळ 63 टक्के मतदारांचा पाठिंबा असल्यामुळं त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. एनडीएकडं त्यांची स्वतःची सुमारे 49 टक्के मते आहेत. त्यात एनडीएच्या बाहेरील काही पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे एनडीएकडे आता सुमारे 63 टक्के मते झाली आहेत. कोविंद यांना एनडीएच्या घटक पक्षांशिवाय जेडीयू 1.90 टक्के मते, एआयडीएमके 5.39 टक्के मते, बीजेडी – 2.99 टक्के मते, टीआरएस – 2 टक्के, वायएसआर काँग्रेस 1.53 टक्के मते,  आणि आएनएलडी 0.38 टक्के मते यांची मते मिळणार आहेत. एआएडीएमकेच्या दोन्ही गटांनी कोविंद यांना पाठिंबा दर्शवला आहे. एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने सुरुवातीला रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने काही काळ एनडीएमध्ये अस्वस्थता होती. मात्र नाराजी व्यक्त केल्याच्या दुस-याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळे एनडीएची बाजू वरचढ झाली आहे. समाजवादी पार्टी आणि बसपा हे पक्षही कोविंद यांना पाठिंबा देतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्यांनी मीराकुमार यांना पाठिंबा दर्शवला आहे.

COMMENTS