एनडीएतून बाहेर पडल्याचं पत्र मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर काय म्हणाले राजू शेट्टी ?

एनडीएतून बाहेर पडल्याचं पत्र मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर काय म्हणाले राजू शेट्टी ?

मुंबई – स्वाभीमानी शेतकरी संघनेनं काल सरकारचा पाठिंबा काढत असल्याचं आणि एनडीएमधून बाहेर पडत असल्याचं पत्र मुख्यमंत्र्यांना सोपवलं. ज्याच्यासाठी एनडीएमध्ये आलो होतो आणि ज्याच्यासाठी वर्षानूवर्ष संघर्ष केला. त्यापैकी कोणतीही गोष्ट गेल्या तीन साडेतीन वर्षात साध्य झाली नाही. शेतक-यांचे  कोणतेही प्रश्न सुटू शकले नाहीत. स्वामिनाथन आयोगाची अमंबबाजवणी निवडणूकपूर्वी आश्वासन देऊनही पूर्ण झाली नाही. शेतकर-यांची स्थिती बिकट झाली आहे. त्यांच्यावरील कर्ज दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच्या मालाला हमी भाव नाही. त्यावर सरकार कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाहीत. शेतक-यांच्याबाबत सरकार अतिशय असंवेदनशील असल्याचीही टीकाही राजू शेट्टी यांनी केली.

शेतक-यांच्या प्रश्नासाठी आता राज्यात आणि केंद्रात मजबूत शेतकरी चळवळ उभी करणार असल्याचंही राजू शेट्टी यांनी सांगितलं. शेतक-यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी आता सर्व पातळीवर संघर्ष उभा करु असंही राजू शेट्टी म्हणाले.

COMMENTS