पाटणा – अवघ्या 16 तासात राजदबरोबरची युती तोडून एनडीएत दाखल झालेल्या नीतीशकुमारांनी दुस-यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता त्यांनी बिहारमध्ये भाजपसोबत संसार थाटलाय. नुकत्याच झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी नीतीशकुमार यूपीएच्या गोटात होते. मात्र राष्ट्रपती निवडणुकीत त्यांनी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या पारड्यात मते टाकली होती. आता ते एनडीएसोबत असले तरी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ते यूपीएच्या उमेदवाराला साथ देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यूपीएमध्ये असतानाच त्यांनी यूपीचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर ते कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
COMMENTS