राज्यसभेसाठी अमित शहा, स्मृती इराणींनी भरला उम्मेदवारी अर्ज

राज्यसभेसाठी अमित शहा, स्मृती इराणींनी भरला उम्मेदवारी अर्ज

अहमदाबाद – भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री स्मृती इराणी यांनी  आज राज्यसभेच्या निवडणुकीसाठी गुजरातमधून अर्ज भरले. गुजरातमध्ये राज्यसभेची निवडणूक 8 ऑगस्ट रोजी होणार आहे. यात निवड झाल्यानंतर अमित शहा प्रथमच संसदेत प्रवेश करतील.

भाजच्या संसदीय समितीने बुधवारी शहा व इराणी हे राज्यसभेसाठी गुजरातमधून निवडणूक लढतील यांची असे जाहीर केले होते. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना शह देण्यासाठी भाजपने त्यांच्याविरोधात कॉंग्रेसचे बंडखोर नेते आमदार बलवंतसिंह रजपूत यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरविले आहे. रजपूत यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनीही आज उमेजवारी अर्ज दाखल केला. अहमद पटेल यांनी यापूर्वीच अर्ज भरलेला आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीला अजून अवधी असल्याने कॉंग्रेसच्या काही आमदारांना भाजपकडे खेचण्यासाठी प्रयत्न करण्या पुरेसा वेळ मिळणार आहे. यासाठी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत तिकीट देण्याचा प्रस्ताव भाजपकडून कॉंग्रेस बंडखोरांपुढे ठेवला जात आहे.

 

COMMENTS