बारामती – शरद पवार काल विविध कार्यक्रमासाठी बारामतीमध्ये आले होते. त्यावेळी विविध विषयावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सहभागी होणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तशा बातम्याही काही माध्यमातून आल्या होत्या. मात्र पवार यांनी या बातमीचं पूर्णपणे खंडण केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणीही केंद्रात मंत्री होणार नाही तसंच राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएसोबत जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या सरकारमधून पडण्याच्या निर्णयावरही त्यांनी भाष्य केलं. त्यांचा एकच मंत्री मंत्रिमंडळात आहे. तो तर बाहेर पडण्याच्या मनस्थितीत नाही. असं सांगत सदाभाऊ खोत यांना चिमटा घेतला. त्याचवेळी त्यांनी राजू शेट्टींचं कौतुक केलं. शेट्टी शेतक-यांबाबत जे आग्रही भूमिका घेत आहेत. त्याला देशभर समर्थन मिळू शकते असं सांगत शेट्टींच्या निर्णयाचं कौतुक केलं.
नारायण राणे भाजपमध्ये गेल्याने विरोधकांवर किंवा काँग्रेसवर फारस परिणाम होणार नाही असंही पवार म्हणाले. फक्त काँग्रेस एका आक्रमक नेत्याला मुकेल असंही पवार म्हणाले.
COMMENTS