एनडीए 2019 लोकसभा निवडणुक मोदींच्या नेतृत्वाखाली लढणार

एनडीए 2019 लोकसभा निवडणुक मोदींच्या नेतृत्वाखाली लढणार

दिल्ली – राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए 2019 साली होणारी लोकसभेची निवडणुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिलीय. एनडीएच्या घटक पक्षांची काल रात्री झालेल्या बैठकीत या बाबतचा ठराव एकमतानं मंजुर करण्यात आला. या बैठकीला एनडीएचे 33 घटक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान भाजपवर प्रचंड नाराज असलेल्या शिवसेनेनं मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिल्याने शिवेसना भाजपबद्दल काहींशी मवाळ झाल्याचं दिसून येतंय. कालच्या बैठकीची सुरुवात अमित शहा यांच्या भाषणानं झाली. तर चंद्रबाबू नायडू, प्रकाशसिंग बादल आणि उद्धव ठाकरे यांचीही भाषणं झाली.

COMMENTS