महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या (एसटी) 69 व्या वर्धापन दिनानिमित्त एसटीच्या ताफ्यात वातानुकूलित शिवशाही बसचा समावेश करण्यात आला आहे.
एसटीच्या ताफ्यात दाखल करण्यात आलेल्या शिवशाही बस संपूर्ण वातानुकुलीत असून 45 आसनी आहेत. यामध्ये प्रत्येक आसनासाठी एलईडी स्क्रीन आणि एफएमवरुन गाणी ऐकण्यासाठी स्वतंत्र हेडफोनची सुविधा देण्यात आली आहे. याचबरोबर प्रवाशांना वाचन करण्यासाठी सोयीस्कर हेडलॅम्प, मागे-पुढे आसन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी राज्याचे परिवहनमंत्री व एसटी अध्यक्ष दिवाकर रावते आणि उपाध्यक्ष रणजीत सिंह देओल (भा.प्र.से.) यांच्या उपस्थितीत शिवशाहीच्या दोन बसचा लोकार्पण सोहळा पार पडला.
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये ही बस धावणार आहे, ज्या मार्गावर हिरकणी धावत आहे त्या मार्गावर शिवशाही धावणार असून शिवशाहीचे भाडे हे हिरकणीप्रमाणेच असणार आहे. एकूण 1500 शिवशाही बसेस वर्षा अखेरपर्यंत एसटी महामंडळच्या ताफ्यात दाखल होणार आहे.
COMMENTS