एसटी कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्ती योजना जाहीर

एसटी कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्ती योजना जाहीर

एसटी कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्ती योजना जाहीर करण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळात वयाची 55 वर्षे पुर्ण झालेल्या व वैद्यकीय अपात्र चालकांना 10 लाख रुपये देऊन स्वेच्छा निवृती देण्याची घोषणा परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे.

राज्य परिवहन महामंडळात 1 लाख 10हजार कर्मचारी असून, यामध्ये चालकांची संख्या 35 हजार आहे. यामधील अंदाजे700 चालक वैद्यकीयदृष्टया अपात्र आहेत. तर वयाची 55 वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 1200आहे. अशा परिस्थितीमध्ये या कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावने शक्य नाही किंवा पर्यायी नोकरी करणेही त्यांना जमणार नाही, म्हणून या कर्मचाऱ्यांसाठी ही स्वेच्छा निवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे.

ज्या एसटी कर्मचाऱ्यांची सेवा 20 वर्षांपेक्षा जास्त झाली आहे, अशा कर्मचाऱ्यांना त्यांचा उर्वरित सेवेच्या प्रमाणात 10 लाखापर्यंत एकरकमी लाभ मिळू शकेल.  ही योजना कर्मचाऱ्यांना ऐच्छिक असून, वयाची55 वर्ष पूर्ण झालेल्याना तिचा विनाअट लाभ घेता येणार आहे.

COMMENTS