ऑनलाईन फसवणुकीची माहिती बँकेला 3  दिवसात कळवल्यास मिळणार पूर्ण भरपाई

ऑनलाईन फसवणुकीची माहिती बँकेला 3 दिवसात कळवल्यास मिळणार पूर्ण भरपाई

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने महत्वापुर्ण निर्णय घेतला आहे.  बँक ग्राहकांना सुरक्षित ऑनलाईन व्यवहार करता यावी यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवी नियमावली जाहीर केली आहे.

बँक ग्राहकाने तीन दिवसांच्या आत ऑनलाइन अनधिकृत इलेक्ट्रॉनिक बँक व्यवहाराने झालेल्या नुकसानीची माहिती दिल्यास त्यांना 10 दिवसांच्या आत संबंधितांच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम जमा होणार आहे. मात्र, दुसऱ्या एका निर्णयात आरबीआय ने थर्ड पार्टी फ्रॉडची सूचना देण्यात जर 4 ते 7 दिवसांचा उशीर झालयास ग्राहकाला 25 हजार रुपयांपर्यंत नुकसान सोसावे लागेल असे म्हटले आहे. त्यामुऴे वेळेत ही सूचना बँकेला दिली नाही, तर खातेदारालाच संपूर्ण नुकसान सहन करावं लागणार आहे. यामुळे वेळेवर फसवणुकीची माहिती बँकेला देणे आता गरजेचे झाले आहे.

COMMENTS