औरंगाबाद – शिवसेनेचा कार्यकर्ता निघाला सुपारी किलर !

औरंगाबाद – शिवसेनेचा कार्यकर्ता निघाला सुपारी किलर !

औरंगाबाद – येथील बँक अधिकारी जितेंद्र होळकर यांच्या हत्येप्रकरणी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. होळकर यांच्या पत्नीनेच त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याचं उघड झालंय. ही सुपारी शिवसेनेचा कार्यकर्ता किरण गणोरे याला दिली होती. त्याने त्याच्या दोन सहका-यांसह होळकर यांची हत्या घडवूण आल्याचं तपासात निष्पन्न झालंय.

जितेंद्र होळकर हे पत्नीच्या चारित्र्यावर नेहमीच संशय घेत होते. त्यामुळे पत्नीने त्यांचा कायमचा काटा काढण्याचं ठरवलं. तीनं शिवसेनेचा कार्यकर्ता असलेला किरण गणोरे याला 2 लाख रुपयांना हत्येची सुपारी दिली. त्याने त्याच्या दोन सहका-यासह शनिवारी पहाटे जितेंद्र होळकर यांची हत्या घडवून आणली.  या प्रकरणी जितेंद्र होळकर यांची पत्नी भाग्यश्री होळकर, किरण गणोरे आणि त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. होळकर यांच्या पत्नीने हत्येची कबुली दिली आहे.

COMMENTS