‘कचरा केला तर पंतप्रधानांकडे तक्रार करीन’, मुख्यमंत्र्यांना कोणी दिली दम ?  

‘कचरा केला तर पंतप्रधानांकडे तक्रार करीन’, मुख्यमंत्र्यांना कोणी दिली दम ?  

 पुणे – ‘कचरा केल्यास पंतप्रधान मोदी यांच्याकडे तक्रार करेन.’ अशी धमकीवजा सूचना मुख्यमंत्र्यांना त्याचीच कन्या दिविजाने हिने दिल्या. पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान हा किस्सा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना सांगितला.  

मुख्यमंत्री म्हणाले की, मी एकदा दिविजा सोबत खेळत होतो. त्यावेळी मी नॅपकिन पेपरचा चेंडू तयार करुन तिच्या दिशेने फेकला. यावेळी तिने मला कचरा केला तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करण्याची धमकी दिली, आता तुम्हीही कचरा करू नका, असा सल्ला देत आपल्यावरील विनोदाचा किस्साच मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितला. मुख्यमंत्र्यानी हा किस्सा सांगितल्यानंतर कार्यक्रमात हशा पिकला.

COMMENTS