कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा? जयंत पाटीलांच्या कोपरखळ्यांनी विधानसभेत एकच हश्श्या

कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा? जयंत पाटीलांच्या कोपरखळ्यांनी विधानसभेत एकच हश्श्या

कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही विरोधक एकनाथ खडसेंच्या घरी गेलो होतो.  जयंत पाटील यांच्या कोपरखळ्यांनी सभागृहात एकच हश्श्या पिकला.

विरोधकांच्या संघर्ष यात्रेदरम्यान आम्ही जळगावात एकनाथ खडसेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली एकनाथ खडसे  आमची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांनी आमचं आदरतिथ्य केलं. असं राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत म्हटलं.

शेतकरी कर्ज माफीसाठी निघलेली संघर्ष यात्रेदरम्यान भाजप नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव गेले होते. यावेळी खडसेंच्या फार्म हाऊसवर अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील, जयंत पाटील, राजेश टोपे यांनी खडसेंची भेट घेतली होती.

संघर्ष यात्रेदरम्यान विरोधकांनी एकनाथ खडसेंच्या घरी भेट दिली होती त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क काढले जात होते.

 

COMMENTS