पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन रजनीकांत करणार राजकारणात एंट्री?

पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन रजनीकांत करणार राजकारणात एंट्री?

भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर सुपरस्टार रजनीकांत हे पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. भाजपने रजनीकांत यांच्याशी संपर्क साधला असून याविषयीचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही, असे सूत्रांनी सांगितले.

रजनीकांत यांनी शुक्रवारी राजकारणात येण्याचे संकेत दिले होते. सध्या माझ्यावर काही जबाबदाऱ्या आहेत. मात्र, जेव्हा अटीतटीची वेळ येईल तेव्हा सर्वांनाच कळेल’ असे सूचक विधान रजनीकांत यांनी केले होते.

COMMENTS