पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू हे मंत्रिपदावर असताना ‘कपिल शर्मा शो’मध्ये काम करत आहेत. याविरोधात पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने नवज्योतसिंग सिद्ध यांना फटकारले.
न्यायालयाने सिद्धूंना फटकारत सांगितले, न्यायालय फक्त ऍक्टिंग फॉरमॅलिटी आहे का, आम्ही कोड ऑफ कंडक्ट लागू करु शकत नाही. टीव्ही शोमधील आपले काम हे कायद्यानुसारच आहे’, असा तर्क सिद्धू यांनी मांडला होता. पण ‘फक्त कायदा सर्व काही नाही नैतिकतेचा विचार केला का? असा प्रश्न या आधी झालेल्या सुनावणीत कोर्टाने सिद्धू यांना केला होता.
दरम्यान, न्यायालयाने दोन ऑगस्टपर्यंत याप्रकरणावर स्थगिती दिली असून, यापुढील सुनावणी नैतिक नाही तर कायद्याच्या मुद्यावरुन होणार आहे. त्यामुळे सिद्धू यांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी राज्याचे अॅडव्होकेट जनरल अतुल नंदा यांनी सांगितले, कायद्यामध्ये अशी कोणत्याही प्रकारची तरतूद नाही की, सिद्धू यांनी टी. व्ही.मध्ये काम करण्यावर बंदी आणता येईल.
COMMENTS