मुंबई – सरकारने दिलेली दीड लाख रुपयांची सरसकट कर्जमाफी यावर चर्चा करण्यासाठी शेतकरी सुकाणू समितीची आज सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. या बैठकमध्ये कर्जमाफीच्या बारकव्यांबाबत चर्चा होणार आहे. बहुतेत शेतकरी नेत्यांना ही कर्जमाफी मान्य नाही. राजु शेट्टी यांनी ही कर्जमाफी संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे. तर रघुनाथ दादा पाटील यांनी संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली आहे. सुकाणू समितीचे इतर नेते याबाबत काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कर्जमाफीबाबत शेतकरी सुकाणू समितीसोबत सरकराने नेमलेल्या मंत्रिगटाने एकमेव बैठक घेतली, त्यामध्ये शेतकरी नेत्यांचं समाधान झालं नाही. त्या बैठकीतून शेतकरी नेते घोषणा देत निघून गेले होते. त्यानंतर सरकराने सुकाणू समितीशी चर्चा करणं टाळलं. इतर राजकीय पक्षांसोबत चर्चा करुन परस्पर निर्णय जाहीर केला. त्यामुळे आजच्या बैठकीतही संपूर्ण कर्जमाफीची मागणी पुन्हा सरकारकडे केली जाण्याची शक्यता आहे. त्यातून पुन्हा आंदोलनाचीही हाक दिली जाऊ शकते.
Older Post
सरसकट कर्जमाफी करायला हवी होती – धनंजय मुंडे
COMMENTS