कर्जमाफी निकषाची बैठक वादळी होणार, सरकारच्या अटी मान्य नाहीत, बैठकीच्या आधीच रुघुनाथदादांचा बॉम्ब !

कर्जमाफी निकषाची बैठक वादळी होणार, सरकारच्या अटी मान्य नाहीत, बैठकीच्या आधीच रुघुनाथदादांचा बॉम्ब !

मुंबई – कर्जमाफी संदर्भात माध्यमातून सरकारच्या अटी शर्ती समोर येत आहेत. त्या आम्हाला मान्य नाहीत असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी दिला आहे. 10 हजार रुपयांची मदत देण्यासाठीच जर एवढ्या जाचक अटी लावल्या असतील तर संपूर्ण कर्जमाफीसाठी किती जाचक अटी लावणार असालही त्यांनी केला आहे. सरकराच्या अटीविना शेतक-यांना कर्जमाफी हवी आहे. त्यासाठी आजच्या बैठकीत मागणी करणार, त्याप्रमाणे कर्जमाफी होत नसेल तर पुन्हा सरकारला आंदोलनाला सामोरं जावं लागणार आहे असा इशाराही रघुनाथदादा पाटील यांनी दिला आहे. कर्जमाफीचे निकष ठरवण्यासाठी राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि शेतकरी सुकाणू समितीचे प्रतिनिधी यांच्यात आज बैठक होणार आहे. मुंबईत सह्याद्री अतितीग्रहावर दुपारी 4 वाजता ही बैठक होणार आहे. शेतकरी सुकाणू समितींच्या प्रतिनिधीमध्ये खासदार राजू शेट्टी, बच्चू कडू, रघुनाथ दादा पाटील, रवि तुपकर, आमदार जंयत पाटील, डॉ. अजित नवले, बँक प्रतिनिधी विश्वास उटगी, शेतकरी प्रतिनिधी धनंजय जाधव (पुणतांबे), संजय पाटील, बळीराम सोळंके या प्रतिनिधींचा समावेश आहे. निकषाविषयीच्या शेतकरी नेत्यांच्या या भूमिकेमुळे आजची बैठक वादळी होण्याची शक्यता आहे.

COMMENTS