मुंबई – एकीकडे भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री कर्जमाफीचे गुणगान गात असताना भाजपमधूनच या कर्जमाफीवर आता तोफा डागू लागल्या आहेत. फडणवीस सरकारने जाहीर केलेली ही कर्जमाफी फसवी असून याची अंमलबजावणी अशक्य असल्याची घणाघाती टीका भाजपचे भंडारा गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी केली आहे. टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना तरी कर्जमाफीचा ऑनलाईन फॉर्म भरता येतो का ? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. सरकार जरी ऐतिहासीक कर्जमाफी म्हणून ढोल बजावत असंल तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी शक्य नाही असंही पटोले म्हणाले. नाना पटोले यांच्या या हल्लाबोलमुळे भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
COMMENTS