कर्नाटकाचे माजी विधान परिषद अध्यक्ष रामभाऊ पोतदार यांचे निधन

कर्नाटकाचे माजी विधान परिषद अध्यक्ष रामभाऊ पोतदार यांचे निधन

बेळगाव – बेळगावचे अजातशत्रू व्यक्तीमत्व, कर्नाटक विधान परिषदेचे माजी अध्यक्ष रामभाऊ पोतदार यांचे आज वार्धक्याने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते.

जनता दलाचे रामक्रष्ण हेगडे यांचे सरकार कर्नाटकात सत्तेवर असताना रामभाऊ विधान परिषद अध्यक्ष होते.  बेळगावात एपीएमसी स्थापन करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. बेळगाव तालुक्यात ऊस उत्पादनाला वाव देण्यासाठी बेळगावच्या आसपास साखर कारखाना असावा,हे त्यांचे स्वप्न होते. त्यातूनच काकतीजवळ साखर कारखाना प्रकल्प 1191 मध्ये उदयास आला पण सरकारी अनास्थेमुळे आजही हा कारखाना गाळप स्थितीपर्यंत पोचलेला नाही.  जनता दलात राहूनही त्यांचे सर्व पक्षातील नेत्यांशी सलोख्याचे संबंध होते.

आज सायंकाळी 4 वाजता शहापूर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

 

COMMENTS