कर्नाटकात ‘जय महाराष्ट्र’ म्हणायला बंदी !

कर्नाटकात ‘जय महाराष्ट्र’ म्हणायला बंदी !

बेळगाव : कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील मराठी भाषिकांची पिळवणूक केली जात आहे. यापुढे कर्नाटकात ‘जय महाराष्ट्र’ ही घोषणा दिल्यास संबंधित लोकप्रतिनिधींचं पदच रद्द करण्याचा इशारा कर्नाटक सरकारनं दिला आहे. बेळगाव दौऱ्यावर असलेले कर्नाटकचे नगरविकासमंत्री रोशन बेग यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

यावेळी रोशन बेग म्हणाले, सार्वजनिक कार्यक्रमात किंवा अधिवेशन काळात कोणत्याही लोकप्रतिनिधींनी ‘जय महाराष्ट्र’चा उच्चार केल्यास किंवा कर्नाटक राज्यविरोधी घोषणा दिल्यास त्याचं पद रद्द केलं जाईल. तसा नवा कायदाच कर्नाटक सरकार आणणार आहे

बेळगाव, निप्पाणी, कारवारसह कर्नाटकातील मराठी बहुल गावांचा महाराष्ट्रात समावेश व्हावा या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून तेथील मराठी नागरिकांचं आंदोलन सुरू आहे. मराठी भाषिकांचा आवाज दाबण्यासाठी कर्नाटक सरकारही नवनवे मार्ग अवलंबत आलं आहे. लोकप्रतिनिधींना दिलेली पद रद्द करण्याची धमकी हा त्याचाच भाग असल्याचं बोललं जात आहे.

 

 

COMMENTS