कर्नाटक रक्षण वेदिकेच्या परिषदेला मनसेची हजेरी

कर्नाटक रक्षण वेदिकेच्या परिषदेला मनसेची हजेरी

कर्नाटक रक्षण वेदिकेनं आज बंगळुरूमध्ये प्रांत भाषा अस्मितेसाठी एका परिषदेचं आयोजन केलंय. या परिषदेत मनसेला सहभागी होण्यासाठी आमंत्रण देण्यात आले होते.  या परिषदेला मनसेने हजेरी लावली असून मनसे तर्फे पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे  बंगळुरूमध्ये दाखल झाले आहेत.

बंगरुळूतील सिटाडेल हॉटेलमध्ये ही परिषद होते आहे. हिंदी भाषेचं वाढतं प्रस्थ या विषयावर या परिषदेत चिंतन होणार असून प्रांत भाषा अस्मितेसाठी सामूहिक चळवळ उभी करण्याबाबत निर्णय अपेक्षित आहे. DMK, तेलगू देसम, तृणमूल काँग्रेस, तसेच पंबाज आणि विविध राज्यातून स्थानिक भाषेच्या अस्मितेसाठी लढणारे पक्ष, संघटना या परिषदेत सहभागी होणार आहेत.

COMMENTS