“त्यांना” मोहन भागवतांचे नाव दहशतवाद्यांच्या यादीत टाकायचे होते ?

“त्यांना” मोहन भागवतांचे नाव दहशतवाद्यांच्या यादीत टाकायचे होते ?

काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव दहशतवाद्यांच्या यादीत टाकायचे होते, असा  दावा  एका इंग्रजी वृत्तवाहिनीने केला आहे. 

संसदेचे पावसाळी आधिवेशन अवघ्या काही तासांवर आले असताना ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीने हा खळबळजनक दावा केला आहे. केंद्रातील यूपीए सरकार सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव दहशतवाद्यांच्या यादीत टाकायचे ठरविले होते. भागवत यांना ‘हिंदू दहशतवादी’ ठरविण्यात येणार होते.

‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे, अजमेर आणि मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांनतर यूपीए सरकारने हिंदू दहशतवादाबद्दल काही निकष तयार केले होते. यामध्ये भागवत यांचे नाव घेण्यात आले होते. याला यूपीए सरकारमधील काही मंत्र्यांचाही पाठिंबा होता. त्यासाठी एनआयएच्या बड्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यात आला होता. या संदर्भातील कागदपत्रे हाती लागली आहेत. ‘हिंदू दहशतवादा’च्या थिअरीनुसार तपास अधिकाऱ्यांना अजमेर आणि इतर काही बॉम्बस्फोटाप्रकरणी मोहन भागवत यांची चौकशी करायची होती. चौकशीसाठी त्यांना भागवत यांना अटक करायची होती.

 

COMMENTS