कवितेच्या माध्यमातून शेतक-यांच्या व्यथा !

कवितेच्या माध्यमातून शेतक-यांच्या व्यथा !

राज्यातल्या शेतकरी सध्या त्रस्त आहे. संप आणि विविध मागण्यांद्वारे तो आपल्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करत आहे.  एका कवीने कवितेच्या माध्यमातून शेतक-याची व्यथा मांडली आहे. मुख्यमंत्र्यांना कवीता संबोधित करते आहे. कुणी लिहीली हे माहित नाही. मात्र सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

बांधवरती -येता -का

मुख्यमंत्री साहेब A/C मधून

बांधावरती येता का?

काही नाही शेतकऱ्यांचे

दुखणे समजून घेता का? 🙁

 

तुमची बायको छान

अमिताभ सोबत नाचती आहे

बघा माझी कारभारीण

दिवस-रात राबती आहे

ऊन, वारा, पावसात

ती माझी सोबती आहे

लोडशेडींगमुळं दारं धराया

रात्रभर जागती आहे

 

कुठल्या जन्माचे पाप

माझ्या सोबत भोगती आहे

कर्जमाफी करणार म्हणून

आशेनं वाट बघती आहे

आणि तिने केलेल्या कष्टाला

हमीभाव ती मागती आहे

 

आमच्या सोबत डबक्यातले

अशुद्ध पाणी पिता का?

मुख्यमंत्री साहेब A/C मधून

बांधावरती येता का?

काही नाही शेतकऱ्यांचे

दुखणे समजून घेता का? 🙁

 

तुमचं पोरगं A/C मधून

कॉनवेंट मधे जातं

माहितीय का काटा टोचल्यावर

किती दुःख होतं?

बाळ माझं तसल्या काट्यांतून

भाकरी घेऊन येतं

विजा पावसात अंगावर

पांघरूण घेऊन पोतं

वासरु माझं झाडाखाली

भिजत बसून रहातं

 

आजारी पडून दोन दिवस

वाजवत रहातं दात

कसे नेनार दवाखान्यात

पैसाच करतो घात

मी आत्महत्या करू नये म्हणून

आंगावर माझ्या ठेऊन हात

सोनूलं माझं मला

चीकटून झोपी जातं

 

माझ्या त्या वासराचे

आश्रु पुसून देता का?

मुख्यमंत्री साहेब A/C मधून

बांधावरती येता का?

काही नाही शेतकऱ्यांचे

दुखणे समजून घेता का ? 🙁

 

धान्य पिकवतो शेतकरी

भाव ठरवतो व्यापारी

तुम्ही आणि तुमचे दलाल

लावता आहात गळ्यास सूरी

सांगा साहेब ही

रीत वाटते काहो बरी?

पिकवणाराच्या हातामधे

किती दिवस देणार तूरी?

 

वामण अवतार सोडून

बळीराजा तुम्ही होता का?

मुख्यमंत्री साहेब A/C मधून

बांधावरती येता का ?

काही नाही शेतकऱ्यांचे

दुखणे समजून घेता का ?

COMMENTS