काँग्रेसचा नारायण राणेंना दे धक्का, सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी बरखास्त, निष्ठावंत विकास सावंत नवे जिल्हाध्यक्ष !

काँग्रेसचा नारायण राणेंना दे धक्का, सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी बरखास्त, निष्ठावंत विकास सावंत नवे जिल्हाध्यक्ष !

मुंबई – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आज ‘सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या आहेत. पक्षाचे नुतन जिल्हाध्यक्ष म्हणून श्री.विकास सावंत यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हा काँग्रेस कार्यकारणी,ब्लॉक अध्यक्ष व ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. नुतन जिल्हाध्यक्ष विकास सावंत हे राज्याचे माजी मंत्री भालचंद्र उर्फ भाई सावंत यांचे चिरंजीव असून ते गेल्या अनेक वर्षापासून पक्षसंघटनेचे काम पाहत आहेत. या निर्णयामुळे राणेंना काँग्रेसने एकप्रकारे धक्काच दिला आहे. भविष्यात राणे भाजपमध्ये गेलेच तर जिल्ह्यातला संपूर्ण पक्ष भाजपमध्ये गेला असे चित्र निर्माण होऊ नये यासाठी काँग्रेसनं ही खबरदारी घेतल्याचं बोललं जातंय.

COMMENTS