काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी यांची प्रकृती चिंताजनक

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी यांची प्रकृती चिंताजनक

नवी दिल्ली- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यपाल नारायण दत्त तिवारी यांना  पक्षाघाताचा झटका आला. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना नवी दिल्लीतील साकेतमधील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तिवारी यांनी तिनदा यूपी आणि एकदा उत्तराखंडचे मुख्यमंत्रीपद भुषवले आहे. 91 वर्षीय तिवारी मागील काही दिवसांपासून आजारी आहेत. एनडी तिवारी यांची पत्नी उज्जवला आणि मुलगा रोहित शेखर हे दोघे सध्या त्यांची काळजी घेत आहेत.

COMMENTS