काँग्रेसच्या आमदारांना फोडण्यासाठी भाजपकडून 15 कोटींची ऑफर – काँग्रेस

काँग्रेसच्या आमदारांना फोडण्यासाठी भाजपकडून 15 कोटींची ऑफर – काँग्रेस

बंगळुरु – ‘भाजपने काँग्रेस विरोधी मतदान करण्यासाठी काँग्रेसच्या 22 आमदारांना 15 कोटी लाच देऊ करत फोडण्याचा प्रयत्न केला आहे’. असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते शक्तिसिंह गोहिल यांनी केला. गुजरातमध्ये 8 ऑगस्ट रोजी राज्यसभेच्या 3 जागांसाठी मतदान होत आहे. काँग्रेसने गुजरातमधून बंगळुरुच्या एका रिसॅार्टमध्ये आणलेल्या आपल्या सर्व आमदारांना रविवारी माध्यमांसमोर आणले. पक्षाचे आमदार असंतुष्ट असल्याच्या चर्चेचे खंडन करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले.
दरम्यान भाजपने मात्र आमदार फोडण्याच्या आरोपांचे खंडन करत प्रश्न केला आहे की, ‘ते काय विकाऊ आहेत का ?’ काँग्रेसच्या ६ आमदारांच्या राजीनाम्यांमागे आपला कोणताही हात नसल्याचे त्यांनी म्हटले. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते प्रकाश जावडेकरांनी काँग्रेसवर निशाना साधत म्हटले की, ‘ते स्वतः मौज-मस्ती करत आहेत आणि भाजपचे आमदार राज्यातील पुरग्रस्त लोकांना मदत करण्यात व्यस्त आहेत. गुजरात काँग्रेसचे नेते भाजपवर लावत असलेले आरोप म्हणजे चोराने पोलिसांना प्रश्न करण्यासारखे आहे. जर त्यांचे नेते त्यांना सोडून जात असेल तर त्याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.’

COMMENTS