गुजरात – बंगळुरूमध्ये पाठवण्यात आलेले गुजरात काँग्रेसमधील 44 आमदारांची आज सोमवारी सकाळी कडक सुरक्षा व्यवस्थेत अहमदाबादमध्ये वापसी झाली आहे. फोडाफोडीचे राजकारण होण्याच्या पार्श्वभूमीवर या आमदारांना बंगळुरूमध्ये पाठवण्यात आले होते.
गुजरातमध्ये 8 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या 44 आमदारांना भाजपाच्या ‘शिकारी’पासून वाचविण्यासाठी बंगळुरूत हलविले होते. गेल्या 10 दिवसांपासून काँग्रेसचे हे 44 आमदार बंगळुरूतील एका रिसॉर्टमध्ये राहत होते.
आज सोमवारी सकाळी जवळपास 4.45 वाजण्याच्या सरदार वल्लभभाई एअरपोर्टवर पोहोचलेल्या सर्व आमदारांना अहमदाबादपासून जवळपास 77 किलोमीटर अंतरावर असलेल्या निजानंद रिसॉर्टमध्ये नेण्यात आले. या आमदारांना निवडणुकीपर्यंत येथेच ठेवण्यात येणार आहे.
COMMENTS