गुजरातमध्ये राष्ट्रवादीचा काँग्रेसला दे धक्का, अहमद पटेलांच्या अडचणी वाढल्या !

गुजरातमध्ये राष्ट्रवादीचा काँग्रेसला दे धक्का, अहमद पटेलांच्या अडचणी वाढल्या !

नवी दिल्ली :-  राज्यसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत, कारण आता राष्ट्रवादीनेही आम्ही कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही असे जाहीर केले आहे. सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल पाचव्यांदा राज्यसभेवर जाण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्यांच्याशी जिंकण्यासाठी भाजपकडूनही युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहे. यातच आता शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.

राज्यसभा निवडणुकीत आम्ही कोणत्याही पक्षासोबत नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. ही निवडणूक 8 ऑगस्ट रोजी होणार आहे. या निवडणुकांमध्ये आम्ही कोणाला पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय अद्याप झालेला नाही असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे तर दुसरीकडे शरद पवार यांनी मात्र कोणासोबतच जाणार नाही असं जाहीर केले .ऐनवेळी राष्ट्रवादीनं घेतलेल्या या भूमिकेमुळे काँग्रेस पक्षाच्या चिंता वाढल्या आहे.

अहमद पटेल यांना विजयासाठी 45 मतांची गरज आहे. अशात आता त्यांना राज्यभेची खासदारकी मिळणार की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण गुजरातमध्ये काँग्रेसचे 57 आमदार होते ज्यापैकी 6 जणांनी राजीनामा दिला आहे, उरलेल्या 51 पैकी 44 आमदार हे बंगळुरूमध्ये गेले आहेत. मात्र इतर 7 आमदार तिथे पोहचलेले नाहीत, हे 7 आमदारही बंडखोरीच्या तयारीत आहेत त्यामुळे अहमद पटेल यांची चिंता वाढली आहे.

दरम्यान अहमद पटेल यांनी मात्र  राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्यालाच पाठिंबा दिल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आताच आपलाला मेसेज आल्याच सांगत राष्ट्रवादीने आमदारांना व्हिप बजावला असून पक्षाचे दोन्ही आमदार आपल्यालाच मदत करतील असा विश्वास व्यक्त केलाय. तसच जेडीयूच्या एका आमदारांनेही आपल्याला पाठिंबा दिल्याचा दावा पटेल यांनी केला आहे.

COMMENTS