“काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी बेपत्ता”

“काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी बेपत्ता”

गेल्या आठवड्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी मतदार संघात राहुल गांधी हरविल्‍याचे पोस्‍टर लावण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच आता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीच्या रायबरेली मतदारसंघातही असाच प्रकार समोर आला आहे. मतदारसंघात सोनिया गांधी हरविल्‍या असल्याचे पोस्टर्स अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. 

रायबरेलीच्या गोरा बाजार, महानंदपूर आणि गव्हर्नमेंट कॉलनी परिसरात अशा प्रकारचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. यात सोनिया गांधींचा पत्ता सांगणाऱ्या व्यक्तीस योग्य ते बक्षीस देण्यात येईल, असे म्हटले आहे. तसेच हे पोस्टर रायबरेलीमधील नागरिकांच्या वतीने लावण्यात आल्याचेही पोस्‍टरमध्ये म्हटले आहे.

या वर्षी जानेवारीपासूनच सोनिया गांधी मतदारसंघात फिरकलेल्या नाहीत.दुसरीकडे राहुल यांनीही फेब्रुवारीनंतर अमेठी मतदारसंघाचा दौरा केलेला नाही. राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी झालेल्‍या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी अमेठीचा दौरा केला होता.

 

COMMENTS