काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या हत्येची सुपारी !

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या हत्येची सुपारी !

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या हत्येची सुपारी एका व्यक्तीनं दिलीय. अरविंद ऊफ चट्टान सिंह नावाच्या व्यक्तीनं ही धमकी दिली आहे. फेसबूकवरुन त्यानं ही धमकी दिली आहे. राहुल गांधी यांना गोळ्या घालणा-यानं आपल्याशी संपर्क करावा असं चट्टानसिंह यानं सांगितलं आहे. राहुल गांधी यांना राजकारण समत नाही ते नेहरु गांधी घरण्याची बदनामी करत असल्याचं त्याचं मत आहे. यावर्षी झालेली उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक चट्टाण सिंह यांनी लढवली होती. सामाजिक क्रांती दल या पक्षाकडून तो रिंगणात होता. दरम्यान पोलिसांनी या धमकीची गंभीर दखल घेत चट्टान सिंह याला अटक करुन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो तुरुंगाची हवा खातोय. चट्टानसिंह याने अभिनेता सलमान खान यालाही धमकी दिली आहे. ट्युबलाईट या सिनेमात तो पाकिस्तानशी युद्ध न करता मैत्री करण्याचा सल्ला देतो आहे. या सीन त्याला आवडला नाही त्यामुळे सलमानला मारण्यासाठी त्याने 50 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

COMMENTS