काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी बेपत्ता, शोधून देणाऱ्यास बक्षीस, पोस्टरमुळे खळबळ !

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी बेपत्ता, शोधून देणाऱ्यास बक्षीस, पोस्टरमुळे खळबळ !

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी बेपत्ता असल्याचे पोस्टर लावण्यात आले आहे. त्यांच्या अमेठी येथील काँग्रेसच्या कार्यालयासमोर हे पोस्टर लावण्यात आले असून राहुल गांधींना शोधून आणणाऱ्यास बक्षीस देण्यात येईल, असे या पोस्टरमध्ये लिहण्यात आले आहे.

खासदार राहुल गांधी अमेठीमधून बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे लोकसभा मतदारसंघातील विकासकामे त्यांच्या कार्यकाळात ठप्प झाली आहेत, असा मजकूर या पोस्टरवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्या अशा वागण्याने अमेठीतील जनतेची फसवणूक झाली आहे. तसंच त्यांचा एकप्रकारे अपमान झाला आहे, अशी व्यथा येथील जनतेने या पोस्टरमधून मांडली आहे.

राहुल गांधी अमेठी मतदारसंघात गेल्या 6 महिन्यांपासून आले नाहीत, असे सांगण्यात येत आहे. राहुल गांधी यांची बदनामी करण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा डाव आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेस समितीचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र मिश्रा यांनी केला आहे.

 

COMMENTS