काँग्रेस नेते विश्वजीत कदम, उद्योजक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर आयकरचा छापा

काँग्रेस नेते विश्वजीत कदम, उद्योजक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर आयकरचा छापा

पुणे- काँग्रेस नेते विश्वजीत कदम आणि उद्योजक अविनाश भोसलेंच्या या दोघांच्याही निवासस्थान आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापा घातला आहे. माजी वनमंत्री पतंगराव कदम यांचे सुपुत्र असलेले विश्वजीत कदम हे उद्योजक अविनाश भोसले यांचे जावई आहेत. छाप्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

अविनाश भोसले यांच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे फोन काढून घेतले आहेत. अशीच तपासणी विश्वजीत कदम यांच्या कार्यालयातही सुरु आहे. अविनाश भोसले आणि विश्वजीत कदम यांच्या कोण-कोणत्या कार्यालयांवर छापेमारी झाली आहे, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. छापेमारी कोणत्या कारणाने झाली आहे, याबाबतही अस्पष्टता आहे.

 

COMMENTS